आजही मनी साठवते त्या जुन्या आठवणी,
डोळ्यासमोर उभ्या असतात क्षणोक्षणी
ती तळ्याकाठीची आपली पहिली भेट,
फक्त नजरेने घायाळ केले मला थेट
मग हळूवार तुझ्या हातांचा स्पर्श,
गालावर उमले प्रीतीचे हर्ष
तेव्हढ्यात पाण्याच्या आवाजाने डोळे उघडतात,
कसले तळे नी कसला स्पर्श,
पाणी भरण्यासाठी बादल्या हाती येतात
स्वप्नांच्या दुनियेत जाऊन परत यायचं असतं,
कारण सत्याचं जग वेगळच असतं
सौ अर्चना दीक्षित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा