छडी लागे छमछम विद्या येई घमघम,
लहानपणी हे शिकलो आपण सर्वात प्रथम
काही जण परीस्थितीवर मात करुन शिकतात,
तर काही आहे त्या परिस्थितीत शिकतात
ते शिक्षण पुस्तकी ज्ञान असो,
वा आयुष्यात मिळणाऱ्या अनुभवांचे असो
विद्येची देवता ही सरस्वती देवी,
निपुणता मिळवण्यास विद्या हवी
आपल्या प्रयत्नांची देखील शिकस्त करु,
योग्य शिक्षण मिळण्यास परीस्थितीवर मात करु
या शारदेला करुन वंदन,
कोणत्याही क्षेत्रात प्रगती करु आपण
सौ अर्चना दीक्षित
मुंबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा