शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२०

शब्दांचा खेळ

 कोणाचे बोलके शब्द 

तर कोणी निःशब्द, 


बोलके शब्द कधी अबोल करी, 

तर निःशब्दात देखील भावना खरी 


कोणी शब्द संहार करुन रणांगण गाजवी,

तर कोणी निःशब्द राहूनही मन खुलवी 


शब्द कोणाचे कधी जुळवी मन, 

निःशब्द देखील पेटवी रण 


जपून असावे शब्दांचे खेळ, 

नाहीतर निःशब्द व्हायला नाही लागत वेळ 


शब्दांनीच कधी माणसे पेटतात, 

तर निःशब्द राहूनही नाती जुळतात 


सौ अर्चना दीक्षित 

मुंबई 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा